Powered By Blogger

Sunday, January 30, 2011


● संस्कृती

शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी ... वांग्याचे भरीत ...गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...दुस-याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...दिव्या दिव्या दिपत्कार... आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे...सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श... कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा...... more

हिंदी-चिनी युद्धाच्या वेळी आघाडीवरला एक मराठी सैनिक कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होता. म्हणून बरोबर आणलेले काही दिवाळी अंक तो धगीसाठी जाळू लागला. जाळण्याआधी चाळता चाळता त्याला एका अंकात 'पु. ल. देशपांडे' हे नाव दिसले. लेखाचे नाव-'माझे खाद्यजीवन'! तो अंक आगीत टाकण्याआधी त्याने वाचायला घेतला. थंडीत एकूणच जिवाला तो वैतागला होता. पण पुलंचा हा लेख वाचल्यावर 'छे! छे! हे सारे खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे' असा त्याने आपल्या मनाशी निर्धार केला!

- श्री. जयवंत दळवी ('पु. ल. एक साठवण